उस्मानाबाद- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वजण काहींना काही मदतीचा हात पुढे करत आहेत. यु. पी. एल. ही निर्जंतुकीकरण करणारी कंपनी आहे. ही कंपनी लोकांच्या मदतीला धावून आली आहे. उस्मानाबाद नगर परिषदेकडून फक्त डिझल आणि ऑपरेटिंगसाठीचा खर्च घेऊन 1 मशीन आज काम करत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात निर्जंतुकीकरणासाठी यूपीएल कंपनी आली मदतीला, अनेक गावांत केली फवारणी - उस्मानाबाद कोरोना
यु. पी. एल. ही निर्जंतुकीकरण करणारी कंपनी आहे. ही कंपनी लोकांच्या मदतीला धावून आली आहे. उस्मानाबाद नगर परिषदेकडून फक्त डिझल आणि ऑपरेटिंगसाठीचा खर्च घेऊन 1 मशीन आज काम करत आहे.
ही मशीन 580 लीटर पाणी व 10 लिटर जंतुनाशक मिळून 3 किलोमीटर अंतराची फवारणी करते. ही मशीन दिवसाकाठी 25 किलोमीटर फवारणी क्षमता करू शकते सध्या उस्मानाबाद शहरात फवारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका, नगर परिषद परिसर आणि पोलीस स्टेशन परिसर येथे फवारणी केली. या फवारणीमुळे कोरोना विषणुवर मात करण्यास मदत होणार आहे. या कंपनीकडून 15 मशीनद्वारे बीड जिल्ह्यातील केज नगर पालिका व उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव, शिरढोण , बोरगाव, रुई यासह इतर ग्रामपंचायतीने आपापल्या गावाची फवारणी पूर्ण करून घेतली आहे.