महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळाला चितपट; पटेल बंधूनी फुलवली अंजीर, चिकूची बाग

भूम तालुक्यातील एका शेतकऱयांने दुष्काळावर मात करत आपल्या शेतामध्ये अंजीर आणि चिकूची बाग फुलवली आहे.

By

Published : Apr 30, 2019, 8:53 PM IST

दुष्काळाला चितपट; पटेल बंधूनी फुलवली अंजीर, चिकूची बाग

उस्मानाबाद- मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्हा दुष्काळामुळे हैराण झाला आहे. वर्षानुवर्षे कमी होत चाललेला पाऊस, खालावत चाललेली पाणी पातळी आणि अचानक होणारी गारपीट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र, भूम तालुक्यातील एका शेतकऱयांने दुष्काळावर मात करत आपल्या शेतामध्ये अंजीर आणि चिकूची बाग फुलवली आहे.

ताहेर पटेल ( शेकापुर, तालुका भूम) या शेतकऱ्याने आपल्या शेतात आणि चिकूची आणि अंजीर या फळपिकांची लागवड केली. या दोन्ही फळ पिकांची लागवड करून जवळपास १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही या पिकातून ताहेर पटेल व मुजावर पटेल हे बंधू लाखो रुपये कमवतात.

दुष्काळाला चितपट; पटेल बंधूनी फुलवली अंजीर, चिकूची बाग
ताहेर पटेल यांची ३ एकर अंजीर तर २ एकर क्षेत्रांमध्ये चिकूची बाग आहे. अंजिराची शेती करण्यापूर्वी त्यांना इतर शेतकऱ्यांनी चुकीचा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. करण काळ्या मातीत अंजीर येणार नाहीत, असे त्यांना शेतकरी सांगत होते. मात्र, पटेल यांनी आपल्या काळ्या जमिनीत अंजिराची लागवड केली. या फळबागांतून ताहेर यांना सर्व खर्च वजा करून वर्षाकाठी ५ लाख रुपयांचा नफा मिळतो.

ताहेर पटेल यांना 'उद्यान पंडित' हा पुरस्कारदेखील मिळाला आहे. पटेल यांचे कुटुंब एकत्रित असून त्यांच्या मदतीसाठी त्यांचे लहान भाऊ असतात. अंजिरबरोबरच चिकू या फळपिकाची जबाबदारी मुजावर पटेल यांच्यावर आहे. त्यांच्या या शेतामध्ये बागा फुललेल्या असल्यामुळे भर उन्हाळ्यातही डोळ्यांना सुखावणारे चित्र येथे पाहायला मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details