उस्मानाबाद- रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयाच्या निवासी वसतीगृहातील ३० विद्यार्थ्यांना पाण्यातून विषबाधा झाली आहे. हे सर्व विद्यार्थी ११ ते १८ वयोगटातील आहेत. या शाळेच्या पिण्याच्या पाण्याचा पाईप लिकेज झाला. त्याद्वारे घाण पाणी मिसळले आणि ते पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिल्याने हा विषबाधेचा प्रकार घडला आहे.
उस्मानाबादेत वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पाण्यातून विषबाधा
शाळेच्या पिण्याच्या पाण्याचा पाईप लिकेज झाला आणि या लिकेजमध्ये घाण पाणी गेले. ते पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिल्याने हा विषबाधेचा प्रकार घडला. १८ मार्चला काही विद्यार्थ्यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केली.
रुईभरमध्ये मुलांची दोन आणि मुलींचे १ वसतीगृह आहे. या शाळेच्या पिण्याच्या पाण्याचा पाईप लिकेज झाला आणि या लिकेजमध्ये घाण पाणी गेले. ते पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिल्याने हा विषबाधेचा प्रकार घडला. १८ मार्चला काही विद्यार्थ्यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केली. तर काहींना अचानक उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. या विद्यार्थ्यांवर डॉ. गणेश पाटील आणि जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. गलांडे यांनी उपचार केले. आज सकाळी याच वसतीगृहातील आणखी काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखु लागल्याने त्यांनाही उपचारासाठी उस्मानाबाद येथे आणण्यात आले आहे. तर प्रकृती सुधारलेल्या १५ विद्यार्थ्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले.