उस्मानाबाद- लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 590890 एवढी मते घेतली आहेत. तर आमदार पाटील यांनी 464021 मते घेतली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सांगळे यांनी 97749 मते घेतली.
उस्मानाबादेत शिवसेनेने राखला गड; ओमराजे निंबाळकरांची बाजी
शिवसेनेने उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचा आपला गड कायम राखला. माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर
ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे सुरुवातीच्या फेरीपासूनच आघाडीवर होते. त्यामुळे दुपारनंतरच शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा विजय घोषित झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील गावागावात शिवसेनेच्या विजयानंतर साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Last Updated : May 24, 2019, 2:28 AM IST