उस्मानाबाद - गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये आजपासून ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे, तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि उद्घाटक ना. धो. महानोर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सुरक्षेबाबत पत्र लिहिण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अन् उद्घाटकाच्या सुरक्षेत वाढ
आजपासूनच ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. मात्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक या दोघांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली.
संमेलनाची धामधूम आणि साहित्य संमेलन अध्यक्षांच्या सुरक्षेत वाढ
संमेलनाचे उद्धघाटक ना. धो. महानोर यांनी काही संघटनांनी संमेलनाला उपस्थित राहू नका, असे फोन केल्याचे सांगितले होते. त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण होऊ लागल्याचे दिसत आहे. सध्या उद्घाटक आणि अध्यक्ष एकाच ठिकाणी थांबले असून दोघांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, उद्घाटक म्हणून मी शब्द दिला त्यामुळे उपस्थित राहणार असल्याचे ना. धो. महानोर यांनी स्पष्ट केले आहे.
Last Updated : Jan 10, 2020, 2:17 PM IST