महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळीचा फटका... रब्बीतील हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त

हजारो रुपयांची महागडी औषधे खरेदी करून पोटच्या पोराप्रमाणे जपलेली द्राक्षाच्या बागादेखील या अवकाळीने जमीनदोस्त झाल्या आहेत.

rabi crop
रब्बीतील हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त

By

Published : Mar 4, 2020, 9:00 PM IST

उस्मानाबाद - खरीपात प्रचंड नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही चांगलाच फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसात मध्यरात्री झालेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे ऐन भरात आलेली ज्वारी आडवी पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. ज्वारीसह रब्बी हंगामातील इतर पिकांना या अवकाळीचा फटका बसला आहे. हरभरा या पिकाचेही 70 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

अवकाळीचा फटका... रब्बीतील हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त

हजारो रुपयांची महागडी औषधे खरेदी करून पोटच्या पोराप्रमाणे जपलेली द्राक्षाच्या बागादेखील या अवकाळीने जमीनदोस्त झाल्या आहेत. तर, पॉलिहाऊसच्यावरती असलेले प्लास्टिक फाटून त्याच्या चिंध्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात प्रामुख्याने रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची लागवड केली जाते. अवकाळी पावसाने ज्वारी काळी पडत असून गव्हाचा रंगही पांढरा होत चालला आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम बळीराजाच्या आर्थिक उत्पन्नावर होणार आहे. या वर्षी जून महिन्यात मुबलक पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांची पेरणी केली. रिमझिम पावसावर ही पिके बहरली होती. परंतु, सोयाबीन काढण्याच्या वेळेतच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले होते. रब्बी हंगामात तरी पदरात पडेल, अशी शेतकऱ्यांना अशा होती. मात्र, आता तीही मावळली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details