महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हॉट्सअॅपवरील अश्लील मॅसेजला कंटाळून प्राध्यापकाची रेल्वे रूळावर आत्महत्या

२७ डिसेंबर २०१८ पासून वारंवार येत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील व्हॉट्सअॅप मॅसेज संदर्भात सोनवणे यांनी येथील पोलीस ठाण्यात २७  फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. मात्र, मॅसेज येतच राहिल्याने प्राध्यापकाने जीवनयात्राच संपवली.

By

Published : Mar 10, 2019, 7:37 PM IST

प्राध्यापकाची रेल्वे रूळावर आत्महत्या

उस्मानाबाद- जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्राध्यापकाने लोणावळा-पुणे लोकल खाली उडी मारून आत्महत्या केली. तानाजी सोनवणे असे प्राध्यापकाचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या मोबाईलवर वारंवार येणाऱया अश्लील एस.एम.एस व जीवे मारण्याच्या धमकीच्या व्हॉट्सअॅप मॅसेजला कंटाळून या प्राध्यापकाने लोणावळा-पुणे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली.


या घटनेत मृतदेहाचे २ तुकडे झाले असून ही घटनातळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर घडली. प्राध्यापक सोनवणे यशवंतनगर (तळेगाव दाभाडे, ता.मावळ) येथे राहत होते. सोनवणे उस्मानाबाद जिल्ह्यातील तांबेवाडी येथील रहिवासी आहेत. २७ डिसेंबर २०१८ पासून वारंवार येत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील व्हॉट्सअॅप मॅसेज संदर्भात सोनवणे यांनी येथील पोलीस ठाण्यात २७ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. मात्र, मॅसेज येतच राहिल्याने प्राध्यापकाने जीवनयात्राच संपवली. सोनवणे हे आंबी (ता. मावळ) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते.

ABOUT THE AUTHOR

...view details