उस्मानाबाद -जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. स्टेट बँकेच्या समोर उभा राहून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीही केली. वेतनवाढ होत नसल्याचे कारण देत बँक कर्मचऱ्यांनी बँका बंद ठेऊन निषेध व्यक्त केला आहे. जुनी पेन्शन पद्धत, पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांसाठी तसेच बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध म्हणून, राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज बंद पाळला आहे.
बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप; उस्मानाबाद येथील सर्व बँका बंद हेही वाचा - बॅंक कर्मचाऱ्यांचा संप: आझाद मैदानात सभा
बंदमध्ये जवळपास 9 संघटनांनी सहभाग घेतला होता तर संपूर्ण भारतभर दहा लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठ्या भांडवलदारांना करोडो रुपयांची कर्जमाफी करुन इतर सोयी सुविधा दिल्या व बँकेला तोट्यात घातले याची भरपाई म्हणून, सर्वसामान्यांच्या खात्यावरती वेगवेगळे पैशांची आकारणी करुन हे पैसे वसूल केले असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच आंदोलक म्हणाले की, बँकेतील संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. आजचा संप सामान्य ग्राहकांच्या विरोधात नसून, न्याय मागण्यासाठी सरकारच्या धोरणा विरोधी आहे.
हेही वाचा - औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 भाविक ठार, 9 गंभीर