उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रतन टाटा यांच्यासह लहान-मोठे उद्योजक पुढे सरसावले असल्याचे पाहायला मिळते. सर्वजण कमी जास्तीची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे जमा करत आहेत. याप्रमाणेच जिल्ह्यातील चिमुकली आता पुढे सरसावले आहेत.
पैशाचा 'गल्ला' फोडून चिमुरड्यांनी केली मुख्यमंत्री सहायता निधीला मदत
कोरोनाला हरवण्याच्या लढाईत आता बालगोपालही सहभागी होत आहेत. उस्मानाबादमधील छोट्या मुलांने मुंबई पाहण्यासाठी जमा केलेली पिगी बँकेतील रक्कम मुख्यमंत्री निधीसाठी देऊ केली आहे.
उमरगा तालुक्यातील मुरूम गावातील कांबळे कुटुंबातील चिमुरड्यांनी वर्षभर जमा केलेला पैशांचा गल्ला फोडुन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. अदिती कांबळे या मुलीने वर्षभर जमा केलेल्या निधी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केला असून आदितीला पिगी बँकच्या पैशामधून यावर्षी मुंबई फिरायला जायचे होते. मात्र कोरोना व्हयारसचे संकट आल्यामुळे सुट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाता आले नाही. म्हणून सामाजिक बांधिलकी जपत या चिमुकल्यांनी गल्ल्यात जमा झालेले 8 हजार 725 रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहेत.