उस्मानाबाद -राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 4 ते 7 जुलै दरम्यान फेसबुक अकाउंटवरून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज विघातक मजकूर टाकणे, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) प्रसिध्द केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.
गृह निर्माण मंत्री आव्हाड यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
सामाजिक एकता व सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे प्रकरण ताजे असतानाच उस्मानाबादमधील प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बालाजी ढेकणे (रा.कौडगाव) यांच्या विरोधात कलम- 153 (अ) (1) (अ), 505 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.