महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शासकीय सेवेत घ्या', उस्मानाबादमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचे आमरण उपोषण

होमिओपॅथिक पदवी घेऊन अनेकांनी ग्रामीण भागात स्वतःला रुग्णसेवेत वाहून घेतले आहे. मात्र, अद्यापही होमिओपॅथिक उपचार प्रणालीला शासनाकडून आधार मिळाला नाही.

'शासकीय सेवेत घ्या', उस्मानाबादमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचे आमरण उपोषण

By

Published : Jul 23, 2019, 10:26 PM IST

उस्मानाबाद- शहरी भागासह ग्रामीण भागातही आरोग्य सेवा देणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी गेल्या 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी हे उपोषण सुरू सुरू करण्यात आले आहे.

'शासकीय सेवेत घ्या', उस्मानाबादमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचे आमरण उपोषण

होमिओपॅथिक पदवी घेऊन अनेकांनी ग्रामीण भागात स्वतःला रुग्णसेवेत वाहून घेतले आहे. मात्र, अद्यापही होमिओपॅथिक उपचार प्रणालीला शासनाकडून आधार मिळाला नाही. अगदी नर्सिंग पदवी घेतलेल्यांनाही शासकीय रुग्णालयांमध्ये सेवेत घेतले जाते. परंतु, होमिओपॅथिक डॉक्टरांना शासनाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याची या डॉक्टरांची तक्रार आहे.

शासनाने सामुदायिक आरोग्य अधिकारी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी 5 हजार 716 जागा जाहीर केल्या आहेत. तेव्हा ही सदरील भरती प्रक्रिया थांबविण्यात येऊन यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश करावा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशा विविध मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होमिओपॅथिक डॉक्टरांनी
आमरण उपोषण सुरु केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details