उस्मानाबाद - लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचा खासदार कोण होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही तासांमध्ये भविष्यातील खासदार कोण? हे उलगडणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण..
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, असे ६ मतदारसंघ असून यामध्ये २ हजार १२७ मतदान केंद्र होते. ही मतमोजणी १५५ फेरीमध्ये होणार आहे.
मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन येथे होणार आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात होईल या मतमोजणीसाठी पर्यवेक्षक सहाय्यक तसेच इतर अधिकारी-कर्मचारी असे ८५० अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम पाहणार आहेत तर कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपाधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक आणि ४५० पोलिस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आलेली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, असे ६ मतदारसंघ असून यामध्ये २ हजार १२७ मतदान केंद्र होते. ही मतमोजणी १५५ फेरीमध्ये होणार आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल अथवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदारसंघात एकूण १४ मतमोजणी टेबल असतील तर टपाली व सैन्य मतदारांच्या मतमोजणी करीता ६ टेबल असणार आहेत ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ८ ते १० तासांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.