महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हे' आहे महाराष्ट्रातील दुष्काळाच्या छायेतील गाजराचे गाव

उस्मानाबादच्या परांडा तालुक्यातील भांडगाव हे गाजराचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. या गावातील गाजरे प्रसिद्ध असून गावात रासायनिक खत न वापरता गाजरे पिकवली जातात.

शेतकरी

By

Published : Feb 16, 2019, 2:12 PM IST

उस्मानाबाद- मराठवाड्याच्या सीमेवरील परांडा तालुक्यातील भांडगाव कायम दुष्काळाच्या छायेत असते. मात्र, या गावाने रब्बी व खरीप हंगामाची पीक कायम संकटात आल्यामुळे यावर एक नवीन मार्ग शोधला आहे. संपूर्ण गावाने शिवारात फक्त गाजराचे पीक लावले आहे. त्यामुळे या भांडगावची ओळख आता गाजराचे गाव अशी होत आहे.

गाजराचे शेत

भांडगावच्या भोसले कुटुंबाची ४ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात १ एकर गाजर लावली आहेत. यातून त्यांना वर्षाकाठी सर्व खर्च जाऊन २ ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते. भोसले पिढ्यानपिढ्या गाजराची शेती करत आहे. हे पीक त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे.

शेतकरी

या गावातील गाजरे प्रसिद्ध आहेत. या गावात रासायनिक खत न वापरता गाजरे पिकवली जातात. त्यांचे बी शेतातच तयार केले जाते. त्यानंतर शेतकरी त्याची लागवड करून ते शेतासमोर किंवा घरासमोर विक्री करतात. हे गाजर खरेदी करण्यासाठी लोकही आवर्जून भांडगावमध्ये येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details