महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवला-तुळजापूर-अक्कलकोट सायकल यात्रेच आयोजन; जनजागृतीचे विविध संदेश

सायकलीवर लावले विविध संदेश फलक लावून येवला ते तुळजापूर- अक्कलकोट सायकल यात्रेचे प्रस्थान झाले आहे. गेल्या 14 वर्षापासून युवकांचा सामाजिक प्रबोधन करण्याचा आगळावेगळा प्रयत्न पिंपळगावातील जय भवानी संस्थेच्या वतीने केला जात आहे.

येवला-तुळजापूर-अक्कलकोट सायकल यात्रेच आयोजन;
येवला-तुळजापूर-अक्कलकोट सायकल यात्रेच आयोजन;

By

Published : Dec 20, 2020, 1:20 PM IST

नाशिक- येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या वतीने सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येवला तुळजापूर आणि अक्कलकोट अशीही सायकल यात्रा पार पडणार आहे. गेल्या 14 वर्षापासून या सायकल यात्रेचे आयोजन केले जाते. या सायकल यात्रेच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध संदेश दिले जातात. यंदाच्या वर्षी सायकल यात्रेमध्ये एकूण 27 सायकल यात्री सहभागी झाले असून यात प्रामुख्याने महिला सायकल यात्रींचा देखील समावेश आहे.


जनजागृती संदेश-

या सायकल यात्रेच्या माध्मयातून सामाजिक, पर्यावरण संवर्धन, आरोग्य विषयक जनजागृती करणारे संदेश दिले जातात. सायकल चालवा-देश वाचवा, सायकल चालवा कोरोना पळवा, समजून घ्यावे लोकन्यायालयाचे मोल, कांद्याचे भाव वाढ, पाणी आडवा-पाणी जिरवा, बेटी बचाव, वन्यजीव संरक्षण व नैसर्गिक संसाधनांचे जतन, वाहतूक सुरक्षा तसेच रक्तदान अवयव दान अशा विविध सामाजिक संदेशाचे फलक सायकलीस लावून ही जनजागृती करत यात्रेतील सायकल स्वार मार्गक्रमण करत पुढे जातात.

सायकल चालवा कोरोना पळवा....

यावर्षी करोना विषाणू महामार्गामुळे ओढवलेल्या परिस्थितीत आपण आपले मानसिक व शारीरिक आरोग्य व स्वास्थ्य सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती तयार होऊन या महामारी दोन हात करण्यास सक्षम होण्याकरता आपण नियमित व्यायाम व सायकलिंग करून आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो, असा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य यावर्षीच्या सायकल यात्रेमार्फत केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details