महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलं; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन

Shankar Borhade Passed Away: प्रसिद्ध साहित्यिक, लेखक. प्रा डॉ शंकर बोऱ्हाडे यांचे आज उपचारा दरम्यान गुरुजी हॉस्पिटल येथे निधन झाले. यामुळं नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलं आहे .

Shankar Borhade Passed Away
डॉ शंकर बोऱ्हाडे

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 10:21 PM IST

नाशिक Shankar Borhade Passed Away :नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे (Dr. Shankar Borhade) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन (Passed Away) झाले आहे. डॉ. बोऱ्हाडे यांच्यावर नाशिकमधील (Nashik News) गुरुजी रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळं नाशिकच्या साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलं : डॉ. शंकर बोऱ्हाडे (Shankar Borhade) हे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रिय असून त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा आधीचा काळोख (ललित) देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र) शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही संपादित पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केलं होतं. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. मराठीचे प्राध्यापक असणारे शंकर बोऱ्हाडे हे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आपले योगदान देत होते.

हेही वाचा -

  1. प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन
  2. Sulochana Latkar Cremated : सुलोचना दीदी अनंतात विलीन, दादर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  3. MS Swaminathan Passed Away : हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचं निधन, चेन्नईत घेतला 'अखेरचा श्वास'

ABOUT THE AUTHOR

...view details