नाशिक - सलादेबाबा कला क्रीडा मंडळ व नाशिक जिल्हा महिला कुस्ती संघ आयोजित 'महिला केसरी कुस्ती स्पर्धा' नाशिकच्या वडनेरभैरव गावात संपन्न झाल्या. श्री. संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम हॉलमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 107 मुलींनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये प्रज्ञा बिरचीया हिने नाशिक जिल्हा महिला केसरीचा मान पटकावला तर, भगूरची भावना दगडे ही उपविजेती ठरली.
नाशिकमध्ये रंगली 'महिला केसरी कुस्ती स्पर्धा'
महिलांसाठी आयोजित ही कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील महिलांनी मोठी गर्दी केली होती. संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम हॉलमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 107 मुलींनी सहभाग नोंदवला होता.
महिलांसाठी आयोजित ही कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील महिलांनी मोठी गर्दी केली होती. देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांनी सक्षम बनावे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी नेहमी तत्पर रहावे. हा हेतू साध्य करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले. 70 किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय महिला केसरीचे विजेतेपद जिंकलेल्या प्रज्ञा बिरचीया हिचा ११ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
विविध गटातील विजेते -
वजनी गट | प्रथम | द्वितीय |
40 किलो | ऋतुजा येवलेकर | प्रतिभा खारूवते |
46 किलो | कावेरी खामकर | हर्षदा भदाणे |
49 किलो | श्रद्धा आव्हाड | अश्विनी उशीर |
58 किलो | आकांक्षा खामकर | पौर्णिमा सावंत |
66 किलो | वैशाली अहिरे | वैष्णवी भालेराव |