महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Water Scarcity Yeola : येवल्यात कांदा पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; टँकरव्दारे पाणी पुरवठा

तालुक्यातील राजापूर, ममदापुर, देवदरी या पूर्व भागातील विहिरींनी तळ गाठला असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आपले पीक वाचवण्याकरिता 3 हजार ते 3200 रुपये देऊन पाणी खरेदी करून आपल्या पिकांना देत आहे. तर जनावरांसाठी देखील पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कांदा पिकाला पाणी देताना शेतकरी
कांदा पिकाला पाणी देताना शेतकरी

By

Published : Feb 22, 2022, 3:08 PM IST

Updated : Feb 22, 2022, 3:23 PM IST

येवला (नाशिक) -येवला तालुक्यातील पूर्व भागातील राजापूर सह परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठले आहे. त्यामुळे टँकरने पाणी विकत घेऊन कांदा पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरचा पर्याय अवलंबला आहे. शेतकऱ्यांना पाण्याअभावी कांदा पिक सोडून देण्याची वेळ आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा वाचवण्यासाठी धडपड केली असून टँकरद्वारे पाणी विकत घेऊन पीक वाचविण्याची धडपक शेतकरी करत आहे.

कांदा उत्पादक शेतकरी आणि संबंधित व्यक्तींनी दिलेली प्रतिक्रिया


3 हजार रुपये टँकर

तालुक्यातील राजापूर, ममदापुर, देवदरी या पूर्व भागातील विहिरींनी तळ गाठला असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आपले पीक वाचवण्याकरिता 3 हजार ते 3200 रुपये देऊन पाणी खरेदी करून आपल्या पिकांना देत आहे. तर जनावरांसाठी देखील पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पिक वाचवण्यासाठी धडपड

फेब्रुवारी महिन्यामध्येच विहिरींनी तळ गाठला असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल, मे, महिना अजूनही पुढे आहे. अशात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. सध्या कांदा लागवड केलेली असल्याने पीक जगविण्याकरता टँकरने पाणी विकत घेऊन कांद्याला द्यावे लागत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अजूनही चांगली असून कोणत्याही ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्यासंदर्भात टँकर संदर्भात प्रस्ताव आलेला नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी अद्यापही कोणत्याच गावात टँकरची वेळ आली नसल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिली आहे.

हेही वाचा -ST Merger Report : आज एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण अहवालावर सुनावणी

Last Updated : Feb 22, 2022, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details