नाशिक- येवला तालुक्यातील गणेशपूर येथे जमिनीच्या वादातून काकाने पुतण्यावर गोळीबार केला असून यात पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. परशुराम थोरात असे गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचे नाव आहे.
परशुराम याच्यावर येवला येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. संशयित आरोपी काका हे माजी सैनिक असून भीमराज थोरात, असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी भीजराज थोरात यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.नाशिक : काकानेच केला पुतण्यावर गोळीबार
नाशिकच्या येवला येथे माजी सैनिक असलेल्या काकानेच पुतण्यावर गोळीबार केला आहे. पोलीस तपास करत आहेत.
प्रातिनिधीक छायाचित्र