नाशिक -जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील मंदिर उद्यापासून (28 मार्च) ते चार एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
मंदिरातील पूजाविधी राहणार सुरू
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाझत अल्यामुळे जिल्हा प्रशासनाने 8 मार्चपासून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पाउले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सातत्याने जिल्हा प्रशासन स्तरावर ती कारवाई करत आहे. यामुळेच आता प्रशासनाच्या वतीने निर्बंध अधिक गंभीरतेने कारवाई करत गर्दी होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच त्र्यंबकेश्वर देवस्थान समितीच्या वतीने उद्यापासून चार एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मंदिर बंद असले तरी रोजच्या नियमित पूजा विधी मंदिरातील केल्या जानार आहेत. देशभरातून मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भाविक येत असतात खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी मंदिर उद्यापासून 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी संगीत आहे.