नाशिक - जिल्ह्यात मानव आणि वन्य प्राण्यांतील संघर्ष सुरूच असून साेमवारी सायंकाळी पाच वाजता बकऱ्या चारुन परतणाऱ्या १० वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते-दरेवाडी येथे घडली आहे. शेतात बकऱ्या चारत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.
काळुस्ते-दरेवाडी येथे बिबट्याचा हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू
वन विभागाने आधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. तसेच या भागातील बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या १८ दिवसांत बिबट्याने जिल्ह्यातील दिंडाेरी, गिरणारे व इगतपुरी परिसरात एकूण तीन बालकांना लक्ष करुन ठार केले आहे.
पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी -
दीपक विठ्ठल गावंडा (वय १०, रा. काळस्ते, दरेवाडी, इगतपुरी) असे मृत लहान मुलाचे नाव आहे. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दीपक हा शेतात बकऱ्या चारत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याने आजूबाजूचा अंदाज घेत दीपकच्या नरडीचा घाेट घेतला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली असून माहिती कळतात वन विभागाने आधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. तसेच या भागातील बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या १८ दिवसांत बिबट्याने जिल्ह्यातील दिंडाेरी, गिरणारे व इगतपुरी परिसरात एकूण तीन बालकांना लक्ष करुन ठार केले आहे.