महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुने नाशिक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 10 जण जखमी

जुन्या नाशिक भागामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत दहा जणांना जखमी केले आहे. या जखमींमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे. महानगरपालिकेने त्वरित याची दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

जुने नाशिक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 10 जण जखमी

By

Published : Jun 29, 2019, 4:55 PM IST

नाशिक - जुने नाशिक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुने नाशिक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 10 जण जखमी

नाशिक शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दुचाकी वाहनांच्या पाठीमागे कुत्रे लागून अनेक अपघात घडत आहेत. मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या मानवी वस्तीत वावर वाढला असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे. जुन्या नाशिक भागामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत दहा जणांना जखमी केले आहे.

या जखमींमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे. महानगरपालिकेने त्वरित याची दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. कुत्रा चावल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी सिडको, इंदिरा नगरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना जखमी केल्याची घटना घडली होती. एका अहवाल नुसार नाशिक शहरात 65 हजार भटकी कुत्री असून महानगर पालिकेने कडून कुत्र्यांचे निर्बिजी करण होतं नसल्याने कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details