नाशिक - गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पारा अचानक 12.6 अंशापर्यंत घसरले. त्यामुळे वातावरणात अचानक गारवा जाणवत होता.
हेही वाचा - धक्कादायक..! तामिळनाडूमध्ये विष घेऊन एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात किमान 16 ते 17 अंश सेल्सिअस, तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र, या थंडीमुळे सकाळी आणि रात्री वातावरणात गारवा जाणवात होता. मात्र, दुपारच्या सुमारास काही प्रमाणात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. त्यामुळे सकाळी थंडी, दुपारी उन, असे काहीसे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. हिवाळा ऋतू सुरू झाला असला, तरी जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडी पडायला सुरुवात झाली. त्यामुळे उशिरापर्यंत ही थंडी राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात महाबळेश्वर सोबतच नाशिकमध्येसर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत असते. या काळात नाशिककर गुलाबी थंडीचा आनंद घेत असतात. आता थंडीला सुरुवात झाल्यामुळे सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्यांची गर्दी देखीलवाढली आहे. तसेच थंडीच्या दिवसात पर्यटक नाशिकला पसंती देत असतात. त्यामुळे हिवाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पारा 5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता, तर यावर्षी उशिराने सुरू झालेली ही थंडी अधिक काळापर्यंत राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.