नाशिकSudhakar Badgujar Case : शासनाच्या फसवणूक प्रकरणाचा तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असून आज बडगुजर यांची एसीबीच्या कार्यालयात तब्बल पावणे दोन तास चौकशी झाली. (Nashik ACB Department) या प्रकरणात बडगुजर यांना अटक होण्याची शक्यता असताना आज त्यांना एसीबीने काही कागदपत्रं सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षीका शर्मिला वालावलकर यांनी सांगितलं. (Sudhakar Badgujar interrogated by ACB)
काय आहे प्रकरण? -सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात दिलेल्या पत्राच्या आधारे एसीबी कडून चौकशी सुरू होती. या पत्रात बडगुजर अँड बडगुजर कंपनीतून 2006 मध्ये निवृत्ती घेतल्या बाबत खोटी कागदपत्रे बनवली. मनपामध्ये 2007 पासून नगरसेवक व इतर पदे भूषवताना बडगुजर कंपनीला मनपाकडून विविध कंत्राटं देत कंपनीच्या माध्यमातून 2007 ते 2009 या कालावधीत 33 लाख 69 हजार रुपये घेत आर्थिक फायदा केला. तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात बडगुजर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्याच कंपनीला कंत्राटं दिल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. गेडाम यांच्या तक्रारीनुसार एसीबीकडून बडगुजर अँड बडगुजर या कंपनीची चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल काही दिवसापासून गुलदस्त्यात असतानाच, एसीबीनं 17 डिसेंबर ला रात्री उशिरा सरकारवाडा पोलिसात बडगुजर यांच्यासह तिघां विरोधात पदाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. यामध्ये बडगुजर यांच्यासह त्यांचे साथीदार सुरेश भिका चव्हाण, साहेबराव रामदास शिंदे यांचा समावेश आहे..