महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

शाळेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देण्यासाठी पेठे शाळेतील शिक्षकांनी कागदापासून गणेश मूर्ती साकारण्याची मोहीम उघडली आहे. अशात जुन्या वर्तमान पत्रांच्या कागदाचा वापर करुन पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी साकारल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती

By

Published : Aug 24, 2019, 8:34 PM IST

नाशिक- येथील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कागदापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारत पर्यावरणाचा संदेश दिला आहे. वर्तमानपत्राच्या कागदापासून बनवण्यात आलेल्या ह्या गणेश मूर्तींची घरोघरी स्थापना देखील करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी साकारल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती
शाळेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देण्यासाठी पेठे शाळेतील शिक्षकांनी कागदापासून गणेश मूर्ती साकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशात जुन्या वर्तमानपत्रांच्या कागदाचा वापर करुन पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. केवळ लाकडाचा बेस, कागद वापरुन विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून गणेश मूर्ती साकारल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपत सर्वधर्मसमभावातून प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या मोहिमेत सहभाग घेत आदर्श निर्माण केला. तयार केलेल्या ह्या कागदी गणेश मूर्तींची गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीवत पूजा करुन विद्यार्थी घरात स्थापना करणार आहेत.नाशिककरांनी ह्या आधी देखील पर्यावरण प्रेमी असल्याचे दाखवून देत मागील वर्षी एकट्या नाशिक शहरातून अडीच लाखाहून अधिक 'प्ला‌स्टर ऑफ पॅरिस'च्या गणेश मूर्तींचे गोदावरी नदीत विसर्जन न करता मूर्तीदान करत एक आदर्श दाखवून दिला होता. शालेय जीवनात प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना पर्यावरण जपण्याचे धडे दिले तर, एक आदर्श पिढी नक्कीच निर्माण होऊ शकेल.

ABOUT THE AUTHOR

...view details