महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Sanjay Raut : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा दररोज अपमान होतोय - खासदार संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गट आणि भाजप गप्प का आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमानाचा बदला घेतला जाईल. राज्यात रोज शिवाजी महाराज यांचा अपमान होतो, हा राज्याचा अपमान नाही का? असा सवालही खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी केला आहे. ते नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 2, 2022, 5:15 PM IST

नाशिक : खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी छत्रपती शिवाजी महारांजाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून ( controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj ) सत्ताधारी नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रात क्रांती झाली. इथे रोज छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होतो. तरी शिंदे गट आणि भाजप गप्प का आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमानाचा बदला घेतला जाईल. असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार संजय राऊत नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना


खासदार गोडसेंना आव्हान -नाशिकमध्ये शिवसेना डॅमेज झालेली नाही, फक्त एक दोन आमदार गेले तर पक्षाला नुकसान होईल असे म्हणता येणार नाही. शिंदे गटात गेलेले आमदार आणि खासदार यांनी परत निवडून दाखवावे, खासदार हेमंत गोडसे यांनी निवडून येऊन दाखवावे अस राऊत यांनी म्हटले. स्थानिक पातळीवर सर्व नेते जागेवर आहेत शिवसेना आहे तिथेच आहे, जे गेले ते गद्दार आहेच आणि नागरिक खोके वाले बोलत आहेत, एका आमदाराला नागरिकांनी बाहेर काढले. शिंदे गटात गेलेले आमदारांचे भविष्य धोक्यात आहे. आम्ही सुरक्षा शिवाय फिरत आहेत तुम्हाला मात्र सुरक्षेची गरज आहे, असे राऊत यांनी म्हटले.


कुठल्याही चिन्हावर शिवसेना निवडून येणार - मी ईडी समोर गुडघे टेकले नाहित,पक्षाचा त्याग केला नाही शिवसेनाशी गद्दारी करणार नाही. मी जामिनावर सुटल्यानंतर ईडीची कारवाई का झाली नाही हे माहीत नाही, मुंबई मनपा आम्ही जिंकणार असेही ही राऊत यांनी म्हटले. सुपारी व्यापाऱ्यांवर करावाई झाली पण ती मंत्रालयात झाली पाहिजे. तिथे सर्व सुपरिबाज आहेत कधीही निवडणूक घ्या,सरकार का टाळत आहेत माहीत नाही. शिवसेना नव्या जोमाने लढणार आणि मशाल, धनुष्यबाण किंवा कुठल्याही चिन्हावर परत निवडून येणार. महाराष्ट्र आज शिवसेनेच्या पाठीशी आहे. सामान्य लोक आमच्या पाठिशी आहे.


त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का - दिवारमध्ये बच्चनच्या हातावर लिहले होते, मेरा बाप चोर है, तसे यांच्या कपाळावर गद्दार हा शिक्का लागला. जे खासदार गेलेत ते प्यारे झाले. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही क्रांती केली आता काय झाले, क्रांतीचे वांती झली का, इथं रोज शिवाजी महाराज यांचा अपमान होतो ,हा राज्याचा अपमान नाही का? असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. गुजरातच्या अनेक मतदारसंघात बाळासाहेब यांचे फोटो लावले जात आहेत. कर्तबगार महिला राज्याची मुख्यमंत्री राहिली तर काय हरकत आहे. महाविकास आघडीचे सरकार पुन्हा येणार,शिवसेना नेतृत्व करणार असे राऊत यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details