महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी; देशभर पाऊस होण्यासाठी केली प्रार्थना

शहरात ठीक-ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांच्यासह भाजपचे सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते.

By

Published : Jun 5, 2019, 5:13 PM IST

नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

नाशिक - मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. मुस्लीम बांधव सकाळपासूनच शहजहाँनी ईदगाह मैदानावर नमाजासाठी येत होते. सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी ईदचा खुतबा, दरूद आणि सलामचे मुख्य धार्मिक कार्यक्रम पार पडले.

नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

शहरात ठीक-ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांच्यासह भाजपचे सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी लहान मुलांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नमाज पठणाच्या वेळी मुस्लीम बांधवांनी देशात सर्वत्र चांगला पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली. रमजान ईद मुख्य नमाजपठण झाल्यानंतर शहरात सर्वत्र ईदचा जल्लोष व उत्साह आढळून आला. बाजारपेठ परिसरात मोठी गर्दी होती. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details