महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केवळ दोन महिन्यांसाठी शाळा सुरू का, पालकांना सवाल

आजपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याचा शासन निर्णय असतानाही केवळ दोन महिन्यांसाठी शाळा का सुरू केली, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थी
http://10.10.50.85//maharashtra/27-January-2021/mh-bhn-01-school-start-vis-mh10037_27012021142226_2701f_01218_278.jpg

By

Published : Jan 27, 2021, 3:33 PM IST

Updated : Jan 27, 2021, 4:06 PM IST

नाशिक (मनमाड) - आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंत शाळा सुरू करण्यात आली आहे. पण, इयत्ता आठवीपर्यंत पास करण्याचा निर्मय असताना दोन महिन्यांनासाठी शाळा का सुरू करण्यात येत आहे, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

केवळ दोन महिन्यांसाठी शाळा सुरू का, पालकांना सवाल

मागील महिन्यात 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तर आजपासून (दि. 27 जाने.) इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. केवळ दोन महिन्यांचा शैक्षणिक वर्ष राहीला असल्याने या निर्णयचा फेरविचार शासनाने करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

संमतीपत्र देण्यास पालकांचा नकार

राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासोबतच विद्यार्थ्यांनी पालकांना शाळेत पाठवताना संमती पत्र देणे बंधनकारक आहे. यामुळे अनेक पालक नाराज झाले असून अनेकांनी संमती पत्र देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

हेही वाचा -राज्यपालांनी शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती - छगन भुजबळ

Last Updated : Jan 27, 2021, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details