महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संततधार पावसाने जुना वाडा कोसळला; नाशिक येथील घटना

नाशिक येथे सुरु असलेल्या संततधार पावसाने दुमजली वाडा कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोसळलेला वाडा

By

Published : Jul 7, 2019, 8:04 PM IST

नाशिक- संततधार पावसाने दुमजली वाडा कोसळल्याची घटना जुने नाशिक परिसरातील भोई गल्ली येथे घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अग्निशामक दलाने तत्परता दाखवल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाड्यात राहणाऱया तीन कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

संततधार पावसाने जूना वाडा कोसळला

जुने नाशिक परिसरात भोई गल्ली येथे कांबळे यांचा दुमजली वाडा आहे. वाड्यामध्ये तीन कुटूंबे राहत होती. सध्या नाशिक शहरात संततधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसाने तो वाडा पुर्णत: भिजला. सकाळपासून वाडा थरथरत असल्याने येथील रहिवासी आधीच सतर्क झाले होते. मात्र वाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले नव्हते. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलातील जवानांनी वाड्याची पाहणी केली. व प्रसंगावधान राखत तात्काळ त्या तीनही कुटूंबियांना वाड्याबाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी हलवले. व काही वेळातच वाड्याची एक बाजू वेगाने खाली कोसळली.

पंधरा दिवसापूर्वी जुन्या नाशकातील संभाजी चौकातही वाडा कोसळल्याची घटना घडली होती. तसेच काजीपुरा भागातील धोकादायक असलेली वाड्याची भिंत मनपा कर्मचाऱयांनी शनिवारी उतरून घेतले. जुन्या नाशिक भागात अनेक धोकादायक जुने वाडे असून महानगरपालिकेने त्यांना वाडा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र वाडा मालक आणि भाडेकरीच्या वादामुळे वाडा खाली केला जात नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details