नाशिक- बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात २ पुरोहितांमध्ये राडा झाल्याचे दृश्य भाविकांना पाहायला मिळाले. रविवारी सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. हे पुरोहित केवळ मारहाणीवर थांबले नाहीत, तर त्यांनी अर्वाच्य शिवीगाळही केली.
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातले एक मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. दरम्यान, रविवारी सकाळी अचानकच येथील २ पुरोहितांमध्ये मारहाण सुरू झाली. ते दोन्हीही पुरोहित एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ करू लागले. तर एका पुरोहिताने चक्क दुसऱ्या पुरोहिताला कानशिलात लगावल्याचेही दृश्य भाविकांना पाहायला मिळाले. नेहमी देवाची पूजा अर्चा करणाऱ्या या पुरोहितांचा हा प्रकार पाहून मंदिरातील भाविकही आवाक झाले आणि काहींनी तर या घटनेचा निषेधही केला.