महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Medical Student Suicide : पैसे हरविल्याने नाशिकच्या भावी डॉक्टर तरुणीची आत्महत्या

कुटुंबाने क्लासची फी भरण्यासाठी दिलेले पैसे प्रवासात हरविल्याने तणावाखाली गेलेल्या भावी डाॅक्टर तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. पंचवटीतील हिरावाडीत असलेल्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाच्या हाेस्टेलमध्ये ही घटना घडली.

Medical Student Suicide in Nashik
श्रुती सानप

By

Published : Jan 1, 2022, 5:08 AM IST

Updated : Jan 1, 2022, 2:59 PM IST

नाशिक - सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबाने क्लासची फी भरण्यासाठी दिलेले पैसे प्रवासात हरविल्याने तणावाखाली गेलेल्या भावी डाॅक्टर तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. पंचवटीतील हिरावाडीत असलेल्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाच्या हाेस्टेलमध्ये ही घटना घडली. ( Medical Student Suicide Nashik ) पाेलिसांनी केलेल्या प्राथमिक चाैकशीत तरुणीची रॅगिंग वा टार्चर झाले नसल्याची माहिती पाेलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी दिली. ( Saptashrungi Medical College Nashik )

बीएचएमएस तिसऱ्या वर्गातील विद्यार्थिनी -

२२ वर्षीय श्रुती सानप असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती बीएचएमएस तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत हाेती. श्रृती ही गेल्या दाेन तीन दिवसांपूर्वी मूळ गावी बीड येथे गेली हाेती. तिला नाशिकमध्ये शिक्षण घेता घेता गायनॅकचा क्लास लावायचा हाेता. त्यासाठी तिला कुटुंबाने सहा हजार रुपये फी भरण्यासाठी दिले हाेते. मात्र, नाशिककडे येत असताना प्रवासातच तिच्याकडून हे पैसे हरविले. तिने सर्वत्र शाेधही घेतला. मात्र, ते सापडले नाही. त्यामुळेत ती तणावाखाली हाेती. त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे पाेलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Corona Cases Hike in Maharashtra : राज्यात दिवसभरात ८ हजार ६७ नवे कोरोनाबाधित, तर ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण

याप्रकरणात आतापर्यंत केलेल्या चाैकशीत तिच्या आत्महत्येस कारणीभूत अशी कुठलीही घटना, त्रास वा रॅगिंगचा प्रकार दिसत नसून तिच्या कुटुंबाचे म्हणणे देखील पाेलीस नाेंदवून घेतील, असे पत्की यांनी सांगितले. याबाबत सर्व अंगांनी तपास केला जात आहे, अशीही माहिती पंचवटी पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक पत्की यांनी दिली. तिच्या अशा मृत्यूने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते.

Last Updated : Jan 1, 2022, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details