महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

दिंडोरी तालूक्यातील देवसाने गावाच्या खालील बाजूस उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनुमंतपाडा व हस्ते दुमाला या परिसरातील नागरिकांना ये-जा करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.

By

Published : Nov 7, 2019, 5:20 PM IST

मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

नाशिक -दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत दिंडोरी निफाड, चांदवड व येवला या तालूक्यातील गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. मात्र दिंडोरी तालूक्यातील देवसाने गावाच्या खालील बाजूस उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनुमंतपाडा व हस्ते दुमाला या परिसरातील नागरिकांना ये-जा करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.

मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

हेही वाचा - आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्ववाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात आले आहे. उनंदा नदीवर कुठल्याही प्रकारे मजबूत पूल नसल्याने, गैरसोय होत आहे. स्थानिकांना आश्वासन देवूनही याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. आमदार नरहरी झिरवाळ यांनी या ठिकाणी तात्पुरता लोखंडी पूल बांधला असून, पुलाला कठडे नसल्याने, स्थानिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.

उनंदा नदीतील सुमारे 30 फुट चाऱ्यांद्वारे हस्ते दुमाला या गावाजवळ उनंदा नदीत पाणी प्रवाहित होत आहे. ते पुढे गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणात जाते. मात्र, स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी लवकर चार चाकी वाहन जाईल येवढा पूल बनवावा अशी सरकारला विनंती केली आहे.

हेही वाचा - कर्जबाजारीपणा आणि मुलीच्या लग्नाची चिंता... जिल्ह्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details