महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकरोड परिसरातील चांदगिरी गावात बिबट्या जेरबंद

नाशिकरोड परिसरात असलेल्या दारणाकाठावर गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत बघायला मिळत होती. दोनवाडे ते बाभळेश्वरपर्यंतच्या गावांमध्ये, तर सातत्याने बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर येत होते. याच ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात चौघांनी आपला जीव गमवला आहे.

By

Published : Jul 30, 2020, 2:50 PM IST

lepord
नाशिकरोड परिसरातील चांदगिरी गावात बिबट्या जेरबंद

नाशिक -नाशिरोड परिसरात दोन महिन्यात 7 बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मंगळवारी पहाटे देवळाली कॅम्प परिसरातील लष्करी हद्दीतून एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणाहून जवळच असलेल्या चांदगिरी गावातून आणखी एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला.

नाशिकरोड परिसरात असलेल्या दारणाकाठावर गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत बघायला मिळत होती. दोनवाडे ते बाभळेश्वरपर्यंतच्या गावांमध्ये तर सातत्याने बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर येत होते. याच ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात चौघांनी आपला जीव गमवल्याने याच परिसरात नागरिकांमध्ये बिबट्याच्या दाहशतीसोबतच संतप्त भावना देखील उमटत होत्या. या ठिकाणी आढळून येणाऱ्या बिबट्यांना नरभक्षक घोषित करून त्यांना ठार मारण्यात यावे, अशी मागणी संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती.

बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून मोहीम राबविण्यात येत होती. वनविभागाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे बघायला मिळत आहे. वन विभागाने नाशिक रोड परिसरात राबवलेल्या या मोहिमेत गेल्या महिनाभरात तब्बल सात बिबटे पकडले. मंगळवारी पहाटे देवळाली कॅम्प परिसरातील लष्करी हद्दीतून बिबट्या जेरबंद करण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे पुन्हा या ठिकाणावरून जवळ असलेल्या चांंदवगिरी गावातून एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

चांदवगिरी शिवारात वनविभागाच्या पथकाने के. के फार्मजवळ काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने बुधवारीच पिंजरा तैनात केला होता. या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे जेरबंद झाला. कैद झालेला बिबट्या हा अंदाजे एक ते दीड वर्षांचा आहे.

दरम्यान, या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून दोन महिन्यात पाच, तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सात बिबटे या दोन महिन्यात पिंजऱ्यात जेरबंद झाले. या भागात बिबट्याची दाहशत वाढत असल्याने नाशिक पश्चिमच्या वनविभागाकडून या भागात बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details