महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमधील घोडांबे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडांबे धरण ६२ टक्के भरले आहे. धरणातील डाव्या कालव्याच्या बाजुला असलेल्या बांधातून पाण्याची मोठी गळती सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

डांबे धरणातून सुरू असलेली पाणीगळती

By

Published : Jul 29, 2019, 5:44 PM IST

Updated : Jul 29, 2019, 9:17 PM IST

नाशिक -जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडांबे धरण ६२ टक्के भरले आहे. धरणातील डाव्या कालव्याच्या बाजुला असलेल्या बांधातून पाण्याची मोठी गळती सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

घोडांबे धरणातून सुरू असलेली पाण्याची गळती
वाढत्या पाण्याच्या दाबामुळे या धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असुन धरणाच्या तळमोरीलाही गळती लागली आहे. तळमोरीतून गळणारे पाणी पाटात जाऊन वाया जात आहे. नागरिकांच्या मते त्यांनी वेळोवेळी तक्रार देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या धरणाचे काम १९९० साली पूर्ण झाले असुन तेव्हापासुन संबंधीत प्रशासनाने कुठलीही दुरूस्ती केलेली नाही. अति पाऊस झाला तर धरणाच्या तडा गेलेल्या भागाला मोठे भगदाड पडून खूप जीवीतहानी होऊ शकते तसेच शेतीचेही नुकसान होईल. त्यामुळे धरणाची डागडुजी करून ही पाणी गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी जलसंपदा विभागाला केली आहे.
Last Updated : Jul 29, 2019, 9:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details