नाशिक :नांदूर मधमेश्वर पक्षितीर्थाला रामरस या जागतिक दर्जाचे 'राज्यस्तरीय पहिले पाणस्थळ' म्हणून मान मिळालेल्या आहे. नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे पक्षीतीर्थ (Nandur Madhmeshwar Bird Sanctuary) म्हणून सर्व दूर परिचित आहे. दरवर्षी या पक्षीतीर्थावर परदेशातून हजारो परदेशी पक्षी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येत असतात. मात्र यंदा नाशिकचे तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत असून निफाड मध्ये थंडी वाढली आहे. मात्र अद्याप परदेशी पाहुण्यांच आगमन (lack of arrival of foreign birds) अभयारण्यात पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने, पक्षी अभ्यासकांमध्ये (raised concerns among ornithologists) चिंतेचे वातावरण आहे.
प्रतिक्रिया देतांना पक्षिमित्र डॉ अनिल माळी
यंदा राज्यावर पावसाची चांगली कृपादृष्टी राहिली. नाशिक जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली, परतीच्या पावसानेही नाशिक जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बांधाऱ्यातून अद्यापही 600 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात 234 दशलक्ष घनफूट इतका जलसाठा असून; बंधारा 91 टक्के भरलेला आहे. याचाही परिणाम पक्षांच्या आगमनावर होताना दिसत आहे.
हिवाळी पक्षी संमेलन लांबणीवर : यंदा अभयारण्यात पक्षांची संख्या मोठया प्रमाणात कमी झाली आहे. अभयारण्याच्या पूर्वेला अद्यापही पक्षी मोठ्या संख्येने नजरेस पडत नाहीत. तसेच पश्चिमेला जेमतेम स्थानिक स्थलांतरित पक्षी दिसून येत आहे; त्यामुळे हिवाळी पक्षी संमेलन लांबणीवर पडू शकते, असा अंदाज पक्षीमित्रांनी वर्तवला आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात अभयारण्य हे पक्षांनी गजबजलेले असते.
या कारणांमुळे पक्षी संख्येवर झाला परिणाम :पावसाळ्यात वाहून आलेली जलपर्णी देखील अभयारण्यात जैसे थे आहे. यामुळे पक्षांसाठी अडथळा निर्माण होत आहे. स्थलांतरित पाहुणांसाठी जलाशयात माती दगडांपासून तयार झालेल्या नऊ-दहा जेट्टीचीही स्वच्छता करण्यात आलेली नाही, जेट्टी रानगवतांमध्ये हरवलेल्या दिसतात. टायफा गवत पावसाळ्यात पोकोलँनद्वारे वन्यजीव विभागाकडून काढण्यात आले, त्यामुळे गवत अद्याप फारसे उगवलेले नाही, परिणामी कीटकांची संख्याही वाढली नाही.
दरवर्षी या पक्षांचे होते आगमन : वेडारघु, मुनिया, वारकरी, खाटीक, जाकाना, ग्रे हेरॉन, कपाशी घार, गडवाल, मार्श हेरीअर, पेटंड हळदी-कुंकू, धनेश, थापट्या, किंगफिशर आदी पक्षांचे आगमन होते.