नाशिक - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीच्या ताफ्यासमोर जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या, म्हणून काही तरुणांची धरपकड करण्यात आली. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधून हिंदुत्ववादी संघटनांकडून जय श्रीराम नावाचे 11 हजार पोस्टकार्ड ममता बॅनर्जींना पाठवण्यात येणार आहेत.
नाशकातून ममतांना 'जय श्रीराम', ११ हजार पोस्टकार्ड पाठवणार
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या 'रामायणाचे' (घटनेचे) पडसाद नाशिकमध्ये उमटल्याचे दिसून आले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यासाठी त्यांना जय श्रीराम नाव लिहलेले पोस्टकार्ड पाठवण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांना प्रभू श्रीरामांनी सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत रामकुंड येथील कपालेश्वर मंदिरासमोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निदर्शन करण्यात आले. यावेळी 'जय श्रीराम' आणि ममता बॅनर्जी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच जवळपास दोन हजार पोस्टकार्डवर नागरिकांच्या हस्ते जय श्रीराम लिहून घेण्यात आले. यावेळी शुभम महाले, अक्षय राठोड, मृणाल घोडके, रमेश मानकर, योगेश गर्गे, प्रांजल देव, प्रतिक शुक्ल, प्रीतम भामरे आदी उपस्थित होते.