महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 8, 2020, 10:19 PM IST

ETV Bharat / state

अवैधरित्या चारचाकीतून मद्यविक्री करणारा अटकेत; दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात

तळीरामांच्या जिभेचे चोचले पुरवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून, त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. सटाण्यातील एका हॉटेलमागे वाहनातून अवैध दारूची विक्री करणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Breaking News

नाशिक- तळीरामांच्या जिभेचे चोचले पुरवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून, त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
सटाण्यातील एका हॉटेलमागे वाहनातून अवैध दारूची विक्री करणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित युवकाकडून 27 हजारांची दारू आणि वाहन असे मिळून दोन लाख 27 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्याच्या दुकानांना टाळे असल्याने मद्यपींचा जीव चांगलाच कासावीस होत आहे. दारू मिळत नसल्याने भट्टीच्या गावठी दारूकडे मद्यपींची पावले वळू लागले आहेत. तर काही महाभाग दुप्पट-तिप्पट किंमतीने दारू विकून संधीचा फायदा घेत आहेत. मात्र, पोलिसांनी हा डाव हाणून पाडला.

रात्री अकराच्या सुमारास शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील हॉटेलच्या बाजूस एका वाहनातून अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी चारचाकीतून अवैध दारू विक्री करताना मिलींद निकम (वय 38) याला मुद्देमालासह अटक करण्यात आली. पोलिसांनी वाहन आणि मुद्देमाल ताब्यात घेतला असून मिलींद निकम याच्याविरोधात दारूबंदीविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details