महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्ली आंदोलन : नाशिकहून शेकडो शेतकरी मुंबईतील राजभवणावर धडकणार

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरी मोर्चा नाशिकहून मुंबईकडे रवाना होत असून, या मोर्चात राज्य भरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.

By

Published : Jan 23, 2021, 7:11 PM IST

Kisan Sabha Farmers protest Nashik
किसान सभाचा शेतकरी मोर्चा नाशिक

नाशिक - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरी मोर्चा नाशिकहून मुंबईकडे रवाना होत असून, या मोर्चात राज्य भरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. 25 जानेवारी रोजी मुंबईतील राजभवणावर हा मोर्चा धडकणार आहे, तर मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या सभेत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी होणार आहेत.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी व मोर्चेकरी

हेही वाचा -अज्ञात व्यक्तीने फवारणी टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्ष बागेचे नुकसान

केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. दिल्लीत एवढ्या दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आतापर्यंत 140 शेतकरी या आंदोलनादरम्यान हुतात्मा झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची परवा नाही, ते एकही मागणी मान्य करत नाही. शेतकरी विरोधी कायदे व्हावेत याबाबत एकाही शेतकरी संघटनेने मागणी केली नव्हती. हे कायदे परस्पर लागू करून मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली. तसेच, कामगार विरोधात चार कायदे त्यांनी लागू केल्याचे अखिल किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी म्हटले.

..या आहेत मागण्या

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, कसत असलेल्या वन जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, कसत असलेल्या देवस्थान, बेनामी, वरकस आकारीपड व गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, कामगार विरोधी चारही श्रमसंहिता रद्द करा, वीज विधेयक 2020 मागे घ्या, शेतीमालाला हमीभाव देणारा केंद्रीय कायदा करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा.

हेही वाचा -जागतिक हस्ताक्षर दिन; डिजिटल युगात हस्ताक्षर पडत चालले मागे

ABOUT THE AUTHOR

...view details