महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वरावर वरुणराजाचा अखंड जलाभिषेक; शहरात पूरस्थिती

बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर, जव्हार आणि मोखाडा परिसराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्र्यंबकेश्वर येथे 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोद झाली असून या जोरदार पावसाने अहिल्या धरण ओव्हर फ्लो झाले, तर गंगासागर तलाव तुडुंब भरला आहे.

शहरात पूरस्थिती

By

Published : Jul 11, 2019, 1:34 PM IST

नाशिक- जिल्ह्यात बुधवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर, जव्हार आणि मोखाडा परिसराला चांगलेच झोडपले आहे. परिसरात झालेल्या या दमदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांवर पुन्हा पाणी साचले होते. शिवाय १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराज मंदिरातही पाणी शिरले होते.

त्र्यंबकेश्वर येथे 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या जोरदार पावसाने अहिल्या धरण ओव्हर फ्लो झाले, तर गंगासागर तलाव तुडुंब भरला आहे.

त्र्यंबकेश्वर नगरीत मुसळधार पाऊस

कचरा डेपो परिसरात नदीपात्रातील पाणी शिरले आणि कचऱ्यासह हे पाणी गोदावरीत आले आहे. हेच पाणी शहरात पिण्यासाठी वापरावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर आवारात पश्चिम दरवाजाने पाणी घुसू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दर्शनबारीत पाण्यात भाविक उभे होते.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर गजानन महाराज संस्थांजवळ असलेल्या पुलावर पाणी आले आहे. तसेच पेट्रोल पंपाच्या समोर देखील रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्लास्टिक कचऱ्यामुळे जागोजागी पाणी तुंबल्याचे चित्र आहे. त्यामुळे देखील शहरातील सखल भागातील जवळपास सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी पाहण्यास मिळाले. डोंगरावर चर खोदून 'पाणी अडवा, पाणी जिरवा' उपक्रमांतर्गत कामगिरी केल्याचा नगरपालिका प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला म्हणून शहरात पूर आला नव्हता. तेव्हा चऱ्या आणि खड्डे खोदल्याचा परिणाम असल्याचे म्हटले गेले. मात्र, यावर्षी आठवड्यात दोन वेळा पूर आल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details