नाशिक - दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गावातील नाल्याला पूर आल्याने शिंदवड येथील फरशीवरुन पाणी वाहु लागले. त्यामुळे वडनेर भैरव, खेडगाव, तिसगाव, बहादूरी आदि गावांचा संपर्क तुटला होता.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस; द्राक्ष बागा संकटात तर सोयाबीनचे नुकसान
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसामुळे टोमँटो तसेच काढणीला आलेल्या सोयाबीन आणि भुईमुंग पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ठेवली होती. मात्र अचानक पाऊस आल्याने ती भिजली. तर काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात तरंगतांना दिसत होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला.
शिंदवड येथे दुपारी 2 वाजेपासून पावसाने सुरुवात केली होती. त्यानंतर 3 वाजता पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे टोमँटो तसेच काढणीला आलेल्या सोयाबीन आणि भुईमुंग पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ठेवली होती. मात्र अचानक पाऊस आल्याने ती भिजली. तर काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात तरंगतांना दिसत होती. त्याचप्रमाणे द्राक्ष छाटणीचा हंगाम असल्याने पोंगा अवस्थेत असलेल्या बागांना अधिकचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला.