नाशिक - दिंडोरी तालुक्यात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसानंतर शेतकरी पेरणीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.
दिंडोरी तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आता मान्सून पूर्व पावसाने दिंडोरी तालुक्याला झोडपले. आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
पाऊस
दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे , पुणेगाव, पांडाणे, अंबानेर, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, माळे दुमाला, काजी माळे, पिंपरखेड, टाक्याचापाडा या परिसरात पाऊस झाला. या पावसामुळे शेती मशागतीसाठी फायदा झाला आहे. कसबे वणीपासून दक्षिण भागात भात, नागली, वरी, उडीद, मुग ही पिके घेतली जातात. त्यासाठी रोहीणी नक्षत्रातच भात व नागलीची रोपे तयार होण्यासाठी बी टाकले जाते.