नाशिकमधील आगीच्या घटनेबाबत माहिती देताना नाशिक :इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जिंदाल कंपनीच्या पॉली फिल्म फॅक्टरीत रिअॅक्टर प्लांटमध्ये स्फोट झाला. या घटनेत दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिमा आणि अंजली अशी दोघा मृत महिला कर्मचाऱ्यांची नावे असून 17 जण जखमी झाले आहेत.
जिंदाल कंपनीत स्फोटाने भीषण आग मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट :जिंदाल कंपनीत भीषण आगीत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात भेट घेतली. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचाराचा खर्च शासन करणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच या घटनेची चौकशीचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
बॉयलरचा स्फोट होऊन आग : या आगीचे आणि धुराचे लोळ उंच उठत असल्याचे चित्र आहे. या आगीमुळे परिसरात एकच भीतीचे वातवरण पसरले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होऊन शर्तीचे प्रयत्न करत आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंडे गाव ( Nashik fire at Jindal company ) याठिकाणी असलेली जिंदाल स्टीलचा कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन आग लागण्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे. लागलेल्या आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीच्या घटनेबाबत माहिती देताना जखमी रूग्ण
१९ कामगारांना सुरक्षित काढण्याचे प्रयत्न सुरूसकाळी 6:30 ते 2:30 पर्यंतची शिफ्ट सुरू असताना कंपनीत स्फोट झाला. या शिफ्टमध्ये 30 कामगार असल्याची माहिती आहेत. आतापर्यंत 11 जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये जखमींना रवाना करण्यात आले आहे. 6 बंब आग विझवित आहेत. बचावकार्यात अडथळे येत आहेत. अद्याप जीवितिहानीची माहिती नाही. आगीत भाजलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.