महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मस्थान अंजनेरीमध्ये साध्या पद्धतीने विधिवत पूजा करून हनुमान जयंती साजरी

दरवर्षी हजारोंच्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी अंजनेरी येथे उपस्थिती लावतात. मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी आलेल्या लोकांकडून होमहवन, पूजापाठ, हनुमान चालीसा पठण असे विविध धार्मिक पूजा-विधी केले जातात. मात्र, यंदाच्या वर्षी जयंतीच्या दिवशी गजबजून जाणाऱ्या या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला.

अंजनेरी
अंजनेरी

By

Published : Apr 8, 2020, 6:04 PM IST

नाशिक- हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी येथे हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटा-माटात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने हनुमान जयंती उत्सव यंदाच्या वर्षी साजरा केला गेला नाही. दोन पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच विधीवत पूजा करून हनुमान जयंती साजरी केली गेली.

दरवर्षी हजारोंच्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी अंजनेरी येथे उपस्थिती लावतात. मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी आलेल्या लोकांकडून होमहवन, पूजापाठ, हनुमान चालीसा पठण असे विविध धार्मिक पूजा-विधी केले जातात. मात्र, यंदाच्या वर्षी जयंतीच्या दिवशी गजबजून जाणाऱ्या या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या मंदिराला असलेला दरवाजा त्यालादेखील कुलूप लावले गेले होते. कोरोनाचे सावट हनुमान जयंती उत्सवावरदेखील पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details