नाशिक : नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे (Nashik Cyber Crime) घडत आहे. त्यातच नाशिक महापालिका (Nashik Municipal Commissioner) आयुक्तपदी नव्याने नियुक्त झालेले, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने बोगस पद्धतीने पैसे उकळण्याचा (Fake account in the name of Municipal Commissioner) प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान याबाबत आयुक्तांनी हा सर्व प्रकार चुकीचा असून याबाबत पोलीस आयुक्तांकडे (Complaint to Police Commissioner in Nashik) तक्रार केली असल्याचे, सांगितले आहे.
फेक मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन :मनपा आयुक्तांच्या नावाने व्हाट्सअप वर एक फेक मेसेज फिरत आहे. या मेसेजच्या माध्यमातून रक्कम उकळण्याचा डाव सुरू झाल्याचे लक्षात आले. आयुक्तांच्या नावाने बोगस खाते उघडून एका भामट्याने हा प्रकार सुरू करून महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्याबाबतची लिंक पाठवली असल्याने, हा प्रकार उघडकीस आला. याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला असता; त्यांनी सांगितले की, 'हा सर्व गैरप्रकार आहे. याबाबत आपण पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर या लिंक वर कोणीही क्लिक करू नये असे' आवाहन त्यांनी केले.