नाशिक - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई कार्यालयातील 6 अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ सध्या होम क्वारंटाईन झाले आहेत. तर मुंबईतील कार्यालय एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आले.
छगन भुजबळ होम क्वारंटाईन; मुंबई कार्यालयातील 6 अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
मंत्रालयातील छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील 6 अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाईन झाले आहेत.
मंत्रालयातील छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत होती. त्यामुळे सुरक्षेतेच्यादृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत तर, मुंबई येथील कार्यालय एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला.
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाईन झाले आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणीकरून घ्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.