महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुतण्याच्या प्रचारासाठी छगन भुजबळ नाशिकमध्ये तळ ठोकून

छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन वैयक्तिक भेटीवर जोर दिला आहे. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदींच्या छोटेखाणी बैठका घेण्यात येत आहेत.

छगन भुजबळ

By

Published : Mar 23, 2019, 8:07 PM IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. समीर भुजबळ यांनी गेल्या २ महिन्यांपासून निवडणुकीसाठी मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. भुजबळ कुटुंबांतील सर्वांनीच प्रचारात स्वतःला झोकून दिल्याचे दिसत आहे.

नाशिक - प्रचारासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करताना छगन भुजबळ

छगन भुजबळ हेआघाडीच्या काळात नाशिकची झालेली विकास कामे मतदारांसमोर मांडत आहेत. मागील ५ वर्षांत भाजप सरकारने दिलेली अश्वासने कशी चुकीची ठरली, नोटबंदी, राफेल घोटाळा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी, असे मुद्दे घेऊन भुजबळ विरोधकांवर तुटून पडत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका समीर भुजबळ यांच्या पथ्यावर आहे. मोदी आणि अमित शहा यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपला मतदान करून नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केले आहे. त्यामुळे आता भुजबळांनी देखील नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीत पक्षाचे नेटवर्क कसे वापरता येईल याचा विचार केला आहे.

मागील लोकसभा निवडणूक स्वतः छगन भुजबळ यांनी लढवली होती. त्या वेळी मोदी लाट, पक्षातील गटबाजी यामुळे भुजबळांना नाशिकमध्ये मोठया फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मागीलनिवडणुकीचा अनुभव घेऊन राजकीय रणनीती आखून भुजबळांनी आता पुतण्या समीर भुजबळ यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. कुठे घोड्यावर तर कुठे बैलगाडीत बसून समीर भुजबळ प्रचारात सहभागी होत आहेत. समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यादेखील प्रचारात सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीला सोबत घेऊन मतदार महिलांपर्यंत पोहोचत आहेत.

युतीकडून खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा अजून झाली नसली तरी त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांच्या गाठी-भेटीवर जोर दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details