महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 19, 2021, 7:22 AM IST

ETV Bharat / state

महाविद्यालयीन तरुणीचे मारेकरी गजाआड; चुलत भाऊच निघाला खूनी

काही दिवसांपूर्वी अहेरगाव-पालखेड कालव्यात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या तरुणीची हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Deepika
दीपिका

नाशिक -अहेरगाव-पालखेड डाव्या कालव्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह सापडल्याने घटना पिंपळगाव बसवंत शहरात खळबळ उडाली आहे. दिपीका अजय ताकाटे (वय 17), असे या मुलीचे नाव असून तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी 48 तासात आरोपी चुलत भाऊ विक्रम गोपीनाथ ताकाटे (रा.कारसुळ) व त्याचा मित्र सौरभ दत्तात्रय निफाडे (रा.खडकजांब) या दोघांना अटक केली आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात -

नाशिकच्या अहेरगाव-पालखेड डाव्या कालव्यात काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह आढळला होता. पिंपळगाव बसवंत जवळील कारसुळ येथील दीपिका अजय ताकाटे या विद्यार्थिनीचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. हा घातपात असल्याचा संशय दीपिका ताकाटे हिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी यादृष्टीने तपास सुरू केला होता. या तरुणीच्या चुलतभावानेच आपल्या मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक महिती पोलीस तपासात समोर आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

रागातून केली हत्या -

मृत तरुणीने आरोपील फिरायला घेऊन जाण्यासाठी व त्याच्यासोबत राहण्यासाठी ब्लॅकमेल केले होते, असे आरोपीचे म्हणणे आहे. त्यामुळे रागाच्या भरात विक्रम ताकाटे याने आपला साथीदार सौरभ निफाडे याच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केला. त्याने अशी कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

वडीलांची काही महिन्यांपूर्वी आत्महत्या....

दीपिकाच्या वडलांनी आठ महिन्यापूर्वीच कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. वडलांच्या जाण्याने दीपिका व १० वर्षाचा लहान भाऊ या दोघांनीही वडिलांच्या दुःखातून सावरत शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. दीपिका मुळची राहणार कारसुळ येथील मात्र शिक्षण घेण्यासाठी ती पिंपळगाव महाविद्यालयात येत होती. त्यातच परिसरातच असलेल्या पाच किलोमीटर अंतरावर आहेरगाव येथे तिचा मृतदेह आढळल्याने तिचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

ABOUT THE AUTHOR

...view details