नाशिक -राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आज नाशिक भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनावेळी त्रिमूर्ती चौक परिसरात पोलीस आणि भाजप महिला पदाधिकाऱ्यांमध्ये झटापटीही झाली. यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाशिक : मंत्री राठोडांविरोधात भाजप आक्रमक, आमदार सीमा हिरेंसह कार्यकर्त्यांची धरपकड
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोडांविरोधात आज नाशकात भाजप पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोडांविरोधात आज नाशकात भाजप पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा बाजी केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
या वेळी पोलीस आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने आंदोलनस्थळी तणावाच वातावरण निर्माण झाले होते. शहरातील त्रिमूर्ती चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनाला भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.