महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये एटीएम फोडणारी टोळी सक्रिय, सायरनच्या आवाजाने चोरटे पसार

नाशिक शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला. मात्र, पोलीस गाडीचा सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले.

By

Published : Mar 6, 2020, 8:20 PM IST

atm-thieving-gang-has-been-activated-in-nashik
नाशिकमध्ये एटीएम फोडणारी टोळी सक्रिय, पोलीस गाडीचे सायरन वाजल्याने चोरटे पसार

नाशिक - शहरात एटीएम फोडण्याच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत. नाशिकच्या जेलरोड परिसरात एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, तो फसला. चोरट्यानी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला होता. त्याच वेळी पोलीस गाडीचे सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले. यामुळेमोठी चोरीची घटना होता होता टळली असली तरी शहरात पुन्हा एकदा एटीएम फोडणारी टोळी सक्रिय झाली अशी चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकमध्ये एटीएम फोडणारी टोळी सक्रिय, पोलीस गाडीचे सायरन वाजल्याने चोरटे पसार

जेल रोड परिसरात सेट फिलोमिना हायस्कूल समोर हे युनियन बँकेचे एटीएम आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएमच्या आजूबाजूच्या सिसिटिव्हि कॅमेऱ्यावर स्प्रे मारले, त्यानंतर एटीएम फोडून बाहेर आणले त्याच वेळी पोलिसांची गाडी सायरन वाजवत गेल्यामुळे एटीएम सोडून चोरट्यांनी पलायन केले.

वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे आता पुन्हा एटीएम सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे बँकांकडून एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून एटीएम मशीन बरोबर सुरक्षारक्षक ठेवावेत असे सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details