येवला(नाशिक)- येवला तालुक्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. यादरम्यान पारेगाव येथील महिला महिला शेतातील विहिरीवर पाणी आणण्यास गेली होती. पाणी घेऊन घरी परतत असताना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट चालू झाला आणि अंगावर वीज पडून ही महिला ठार झाली. शोभा काळे (28 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे.
येवल्यात वीज कोसळून महिला ठार, एका झाडाने घेतला पेट
नाशिकच्या येवला तालुक्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. दरम्यान, एका घटनेत वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला.
येवल्यात वीज पडून महिला ठार, तर वीज पडल्याने झाडाने घेतला पेट
तालुक्यात पुरणगाव येथील शेतकरी चिंधु वरे यांच्या वस्तीवरील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने वरच्या वर पेट घेतला. या नारळाच्या झाडाखाली कांद्याची चाळ, पोत्यामध्ये भरून ठेवलेले धान्य होते. ते पेटू नये म्हणून या शेतकऱ्याने स्थानिकांच्या मदतीने पेटते झाड कापून टाकले. एकीकडे कोरोनाचा कहर चालू असल्याने बाजार समित्या बंद आहेत. पीक बाजारात नेता येत नाही, त्यात अशाप्रकारे पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे.
Last Updated : May 15, 2020, 11:03 AM IST