महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुत्ता गोळीची विक्री, २ संशंयितांना अटक

गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अटल मुद्गल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. त्याठिकाणाहून २ संशंयितांना अटक करण्यात आली. तसेच त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 'निट्राझेपम १० मिलीग्रॅम' या औषधाच्या ३०० गोळ्या सापडल्या.

संशंयीत आरोपी

By

Published : May 10, 2019, 1:21 PM IST

नाशिक - बंदी असलेल्या घातक कुत्ता गोळीची विक्री करण्यासाठी आलेल्या २ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास ५ हजार रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे.

प्रेम सुधाकर पवार आणि शाहरुख सिकंदर शेख, अशी संशंयितांची नावे आहेत. कुत्ता गोळी ही मनोविकारावर परिणाम करते. एवढेच नाही तर ही गोळी नशेसाठीदेखील वापरण्यात येते. नाशकातील द्वारका परिसरात पॉकीटातून काहीतरी देवाणघेवाण होत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अटल मुद्गल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. त्याठिकाणाहून २ संशंयितांना अटक करण्यात आली. तसेच त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 'निट्राझेपम १० मिलीग्रॅम' या औषधाच्या ३०० गोळ्या सापडल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात एनडीपीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details